अश्या लोकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ऐनपुर ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे यांनी कडक पावले उचलली आहेत थकबाकीदार कर भरत नसतील त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात येत आहे जेव्हा थकबाकीदार कर भरतील त्यावेळेस त्यांचे नळ कनेक्शन पुर्ववत सुरू करण्यात येणार आहे अशी सक्त ताकीद देऊन कर वसुली ला सुरुवात करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
यामुळे मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत कर वसुली करण्यात येणार असल्याने थकबाकीदार यांनी वेळेवर कर भरुन ग्रामपंचायत ला सहकार्य करावे यामुळे गावातील विकासकामे मार्गी लागतील असे ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे यांनी सांगितले कर वसुलीसाठी ग्रामपंचायत चे लिपिक सोपान कोळी, विनायक पाटील, पाणी पुरवठा कर्मचारी भगवान कोळी, जितेंद्र महाजन गावात घरोघरी जाऊन घरपट्टी पाणीपट्टी वसुली करीत असून कर न भरणाऱ्या लोकांचे नळ कनेक्शन बंद करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे.

