रावेर तालुक्यातील विटवा शेती शिवारात ४५ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील विटवा शेत शिवारात भादू रमेश मनुरे (वय-४५) या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरूवार १० मार्च रोजी समोर आली आहे. याबाबत तर्क वितर्क काढण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात दोन मुले असा परिवार आहे. रावेर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

