रावेर नगरपालिकेने सन २०२२ २३ करिता ९७.७७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. शहरवासीयांना करवाढ नसल्याचा दिलासा देणारा १५ कोटी ९६ लाख ३७ हजार ५८० रुपयांचा शिलकीं अर्थसंकल्प प्रशासक तथा फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग (Faijpur SDO Kailas Kadlag) यांनी २५ फेब्रुवारी रोजी सादर केला. [ads id="ads1"]
हद्दवाढ झालेल्या भागासाठी तरतूद
हद्दवाढ झालेल्या भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी विशेष निधीची नसला तरी यंदा या भागासाठी एकंदरीत तरतूद गृहीत धरण्यात आली आहे. यामुळे या भागातील रहिवाशांना अनेक कामे होण्याची अपेक्षा आहे.[ads id="ads2"]
या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न ३० कोटी २५ लाख १२ हजार ८२५ रुपये, तर ३३ कोटी ८८ लाख ४२ हजार १४४ रुपये खर्च तसेच भांडवली जमा ४४ कोटी ४६ लाख ९६ हजार रकमेतून ४३ कोटी ९४ लाख ९६ हजार खर्च वजा जाता व आरंभीची शिल्लक १५ कोटी ०७ लाख ६६ हजार ९०३ असून, १५ कोटी ९६ लाख ३७ हजार ५८०चा शिलकी अर्थसंकल्प प्रशासक तथा फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी सादर केला.
या शिलकी अथर्थसंकल्पात महसुली उत्पन्नातून दुर्बल घटकांसाठी ११ लाख, महिला व बालकल्याण घटकांसाठी ४ लाख ८९ हजार ५००, अपंग कल्याणा विकास योजनेंतर्गत घटकांसाठी ५ लाख ५० हजार, वेतन राखीव निधीकरिता १ कोटी ०९ लाख ९२ हजार ८५०, पाणीपुरवठा राखीव निधी २२ लाख ६० हजार ५००, भविष्य निर्वाह निधीसाठी ७६ लाख ६५ हजार, निवृत्ती वेतन योजना निधी २ कोटी २० लाख वृक्ष संवर्धन निधी ५ लाख ३२ हजार ६०० तसेच घसारा निधीसाठी २२ लाख ५ हजाराची तरतूद करण्यात आली आहे.
गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे शासनाकडून शहरातील हद्दवाढ झालेल्या भागातील मुलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध झाला नाही. यंदा या अर्थसंकल्पात हद्दवाढ झालेल्या भागाकरीता ९.५ कोटी रुपयांची तरतूद एकंदरीत तरतुदीत गृहीत धरून अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे.
- स्वालिहा मालगावे, मुख्याधिकारी, नगरपालिका,रावेर

