कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील विद्यार्थी विकास विभाग व सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी मुले/मुली व्यक्तिमत्व विकास १० व्याख्याने अंतर्गत 'रोजगाराच्या संधी कशा शोधाव्या' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. [ads id="ads1"]
या व्याख्यानाचे प्रमुख पाहुणे माननीय नरेंद्र पाटील अकॅडमी, जळगाव, यांनी जिथे जिथे रोजगार उपलब्ध होत असेल त्या ठिकाणी आपल्या पात्रतेनुसार रोजगार केला पाहिजे असे त्यांच्या व्याख्यानांमध्ये सांगितले आजच्या या व्याख्यानाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी. अंजने यांनी विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएट होऊन रोजगाराच्या संबंधी विविध माध्यमातून माहिती मिळविली पाहिजे. [ads id="ads2"]
आजच्या या तंत्रज्ञान युगामध्ये मोबाईल मध्ये गुगल वरून खूप काही रोजगारा संबंधी माहिती मिळविता येते असे त्यांच्या अध्यक्षीय समारोपा मध्ये सांगितले आजच्या या व्याख्यानाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विनोद रामटेके यांनी केले या व्याख्यानाच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. संदीप साळुंके यांनी केला या कार्यक्रमाला ११५ विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आयोजनासाठी प्रा. एच एम बाविस्कर, प्रा. डॉ. एस एन वैष्णव, प्रा. डॉ. संदीप साळुंके, प्रा. डॉ. आर. व्ही. भोळे, प्रा. डॉ. पी.आर.गवळी व प्रा. डॉ. विनोद रामटेके यांनी परिश्रम घेतले. शेवटी मान्यवराचे आभार प्रा. डॉ. एस.एन. वैष्णव यांनी मानले.

