ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)
ऐनपुर येथे विद्युत वितरण कंपनी ने भोंगळ कारभारामुळे अपघाताला आमंत्रण ठरणारे आहे.सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथे सन १९६४मध्ये इलेक्ट्रीक पोल टाकून प्रकाशमय केले परंतु आजची परीस्थिती ही वेगळी झालेली असून १९६४ पासून आज पर्यंत पोल वरील तार जिर्ण झालेले असून नेहमी कुठे न कुठे तार तुटून पडतात परंतु विद्युत वितरण कंपनी ने जुने तार बदलवून नविन तार टाकले जात नाही बहुतेक ठिकाणी विद्युत पोल वाकलेल्या परीस्थितीत दिसून येत आहे.[ads id="ads1"]
परंतु कंपनी कडून त्या पोलकडे पाहून न पाहील्या सारखे होतांना दिसून येत आहे अशीच परिस्थिती ऐनपुर येथील नविन पुनवर्सन टप्पा क्रमांक ३ या भागात विद्युत रोहीत्र पुर्ण अवस्थेत वाकलेले असून ते जमिनीवर कोसळण्याच्या तयारीत आहे असे असतांना त्या रोहीत्रावर चार ही दिशेने तार गेलेले आहे हे विद्युत रोहीत्र जमिनीवर कोसळले तर चार साईडचे तार तुटून सोबतचे पोल घेऊन पडणार आहे.[ads id="ads2"]
यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही याकडे विद्युत वितरण कंपनी ने लक्ष देण्याची गरज आहे या भागातील नागरिकांची विद्युत वितरण कंपनी ह्या विद्युत रोहीत्र चे काम कधी करणार याकडे लक्ष लागले आहे त्याचप्रमाणे गावांतील इलेक्ट्रीक पोल जिर्ण झालेले तार लवकरात लवकर बदलवून होणारे अपघात टाळावे अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

