नाशिक विभाग पदविधर मतदार संघाचे आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतुन रावेर तालुक्यातील ११ शाळांना ११ संगणकाचे वाटप शुक्रवार रोजी विवरे बेंडाळे हायस्कूल मध्ये झालेल्या कार्यक्रमात डॉ केतकी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.[ads id="ads2"]
यांना शाळांना दिले संगणक
जावळे माध्यमिक विदयालय कुसुंबा, जि प प्रथमिक शाळा कुसुंबा , जि प मराठी शाळा निंबोल, अँग्लो उर्दू हायस्कूल रावेर , अलहसनात उर्दू हायस्कूल रसलपुर , जि प मराठी शाळा मोरगाव खुर्द,ना गो पाटील विद्यालय उदळी, विकास माध्यमिक विद्यालय खिरवड,सौ के एस अगरवाल हायस्कूल रावेर , प्रगति विदयालय रोझोदा,चिनावल हायस्कूल या ११ शाळांना संगणक वाटप करण्यात आले.
विवरे येथील श्री ग गो बेंडाळे हायस्कूल येथे झालेल्या संगणक वाटप कार्यक्रमाला प्रसंगी गोदावरी फौंडेशन सदस्या डॉ केतकी पाटील , श्रीमती गोदावरी पाटील ,रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद, महाराष्ट्र राज्य माध्यामिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे के पाटील , रावेर शिक्षण संवर्धन संघाचे चेअरमन प्रा प्रकाश मुजुमदार ,विवरे हायस्कूल चेअरमन धनजी लढे , सचिव शैलेश राणे, माजी ग स संचालिका सौ कल्पना पाटील , दिलीप पाटिल ,माजी सरपंच वासुदेव नरवाडे ,नारायण घोडके , रोझोदा हायस्कूलचे सचिव डॉ मनिष फेगडे,रमेश पाचपांडे, वसंत राणे, केशव राणे,मनोहर राणे,मुख्याध्यापिका सौ हर्षाली बेंडाळे, कमलाबाई गर्ल्स हायस्कूल प्राचार्या सौ संध्या कानडे,पर्यवेक्षिका जयश्री पुराणिक, वाय एल पाटील ,विनायक तायडे , अँड इमाम तडवी, राकेश मोरे , जितेंद्र पाटील, सुनिल महाजन यासह चेअरमन , व्हाईस चेअरमन, संचालक , शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते . सुत्रसंचलन शैलेश राणे यांनी तर आभार प्रा विनोद पाटील यांनी आभार मानले

