रावेर पंचायत समिती मध्ये शौचालय योजनेत गैरव्यवहार झाल्या प्रकरणी त्री सदस्यीय समिती गठीत

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  : रावेर पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तीक शौचालय योजनेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी बीडीओ दीपाली कोतवाल यांनी त्री सदस्यीय समिती गठीत केली आहे.[ads id="ads1"] 

स्वच्छ भारत योजने अंतर्गत दिलेल्या लाभाच्या माहितीचा अहवाल चौकशी करून सात दिवसात हि समिती रावेर पंचायत समितीच्या बीडीओ दिपाली कोतवाल यांना सादर करणार आहे. यामुळे रावेर पंचायत समितीमध्ये कर्मचाऱ्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.[ads id="ads2"] 

रावेरयेथील पंचायत समिती मार्फत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या नागरिकांना लाभ देण्यात येतो. मात्र या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीरावेर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार या विभागाची पंचायत समिती अंतर्गत चौकशी करण्यासाठी बीडीओ कोतवाल यांनी सहायक प्रशासन अधिकारी राजाराम काळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ज्ञानदेव निळे व अनिल चौधरी या तिघांची त्री सदस्यीय समिती नेमली आहे. 

या समितीने ऑगस्ट २०२० ते आजपर्यंत स्वच्छ भारत मिशन कक्षात प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांची संपूर्ण चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. संपूर्ण चौकशीचा अहवाल सात दिवसात समिती बीडीओंकडे पुढील कारवाईसाठी सादर करणार आहे. समिती काय ? अहवाल देते यावर साऱ्या तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे.

जि.प.सिईओ लक्ष घालावी - जनतेची मागणी

रावेर पंचायत समिती नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असणारी म्हणून नेहमी ओळखली जाते.ग्रामीण जनतेच्या समस्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सिईओ डॉ.पंकज आशिया यांनी लक्ष घालावे असा सुर उमतटतांना  दिसून येत आहे.रावेर पंचायत समितीत दिवसेंदिवस  लोकांच्या तक्रारी वाढत आहे.आपसी हेवे-दाव्यांमुळे प्रकाशझोतात असणारी पंचायत समितीत सोई-प्रमाणे प्रशासन चालवले जात असल्याची ओरड  जनतेमधून होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!