यावल तालुक्यातील न्हावी येथील विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

यावल प्रतिनिधी (किरण तायडे) यावल तालुक्यातील न्हावी येथील ३० वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी सासू-सासरे व दिर यांच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[ads id="ads1"] 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील न्हावी येथील ३० वर्षीय विवाहिता ह्या पती व मुलांसह वास्तव्याला आहे. ९ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास विवाहितेचे सासरे त्यांना दारूचे व्यसन असल्याने घरात यांचा कौंटुबिक वाद निर्माण झाला. [ads id="ads2"] 

 यावरून विवाहितेचा दिराने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केली व पकडून तिचा विनयभंग केला. भांडण सोडवण्यासाठी विवाहितेचा पती आला असता त्याला देखील मारहाण केली आणि तुझ्या मुलांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी विवाहितेने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात दीर, सासू आणि सासरे यांच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश भराटे करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!