यावल प्रतिनिधी (समाधान गाढे) यावल (Yawal) तालुक्यातील बामणोद (Bamnod) येथे एका शेत विहीरीत काम करत असतांना भाऊलाल रामदास मोरे व बापू काशिनाथ कानळजे (Kanlaje) दोघे रा. मोयखेडा दिगर ता. जामनेर हे दोघ मजुर विहिरीत पडून ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली.[ads id="ads2"]
घटनेची माहिती मिळताच रात्री अकरा वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर अखेगावकर (API Siddheshwar Akhegaonkar) पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, सहायक फौजदार हेमंत सांगळे, पोलिस नाईक किरण चाटे, विकास सोनवणे, उमेश सानप हे घटनास्थळी दाखल झाले रात्री अंधरात शोध घेणे शक्य नसल्याने शुक्रवारी सकाळ पासुन पोलिस (Police) पथक मृतदेह शोधकाम करतांना ११ वाजेला एक मृतदेह मिळून आला आहे तर दुसरा मृतदेह शोधने अजूनही सुरू आहे. असल्याची माहिती समोर येत आहे.

