रावेर नगरपालिका प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर ; "या" तारखेपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर  नगर पालिका (Raver Nagar Palika) निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. रावेर शहराची (Raver City) हद्दवाढ झाल्यामुळे रावेर शहराची नगर पालिकेची प्रारूप प्रभाग रचना तयार करून ती गुरुवारी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली असल्याची माहिती रावेर नगर पालिकेच्या मुख्याधिकारी (Raver Nagar Palika CEO)  स्वालिहा मालगावे यांनी दिली.[ads id="ads2"]  

रावेर नगर (Raver Municipal Corporation) मुदत संपली असून प्रशासनाने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. हद्दवाढीमुळे समाविष्ट झालेल्या भागासह प्रारूप प्रभाग रचना तयार करून प्रस्ताव मा.जळगाव जिल्हाधिकारी (Jalgaon Collector) यांचे कडे पाठवला आहे. ही प्रारूप प्रभाग रचना तयार करताना रावेर नगर पालिका प्रभागांची संख्या प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमातीची(ST) सन २०११ मधील जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र विचारात घेतले आहे. त्यास ७ मार्चपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. अशी माहिती समोर येत आहे.

रावेर नगरपालिका

रावेर शहर

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!