प्रा धापसे यांचे गेल्या 14 वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. प्रा.धापसे हे रावेर महाविद्यालयातील उपक्रमशील शिक्षक असून सातत्याने गरीब होतकरू विद्यार्थ्यांना करीता वेगवेगळे उपक्रम राबवित असतात.[ads id="ads2"]
तसेच रावेर तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांमध्ये जाऊन सामाजिक प्रबोधना बरोबरच,वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना मदत करतात, याच कार्याची दखल घेऊन आज त्यांच्या सन्मान करण्यात आला.या पुरस्कारामुळे संस्थेचे चेअरमन श्री.हेमंतशेठ नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.व्ही.दलाल, उपप्राचार्य. डॉ. व्ही.बी. सूर्यवंशी, IQAC समन्वक डॉ. एस. आर. चौधरी, कबचौउमवी, जळगांव सिनेट सदस्य व प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष डॉ.अनिल पाटील,तसेच महाविद्यालयात सर्व जेष्ठ सहकारी प्राध्यापक शिक्षककेतर कर्मचारी, सर्व मित्र परिवार माजी विद्यार्थी ,महाविद्यालयात सर्व विद्यार्थी व तसेच समाजातील सर्व हितचिंतक आप्तेष्ट व नातेवाईकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


