तामसवाडी ता.रावेर प्रतिनिधी(राजेश रायमळे)
तामसवाडी ता. रावेर येथील पिण्याच्या पाण्यात टाकीतून काढलेल्या ओव्हरफ्लो पाईपमधून निघत आहेत मेलेल्या कबुतरांची सडलेली मुंडके
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तामसवाडी ता. रावेर येथील संपूर्ण गावासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ज्या टाकीद्वारे केला जातो, त्या टाकीतून ओव्हरफ्लो पाणी वाहून जाण्यासाठी काढलेल्या पाईपमधून मेलेल्या कबुतरांची सडलेले मुंडके बाहेर पडलेले दिसून आलेत.[ads id="ads2"]
अर्थातच कितीक महिन्यांपासून पाण्याची टाकी धुतलेली नाही आधीच जागतीक महामारीने नागरिक त्रस्त आहेत त्यातच पिण्याच्या पाण्यातच ही सडलेली कबुतरे आढळून येत आहेत. व त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामप्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

