ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
रावेर तालुक्यातील ऐनपूर गावात मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या आमदार निधीतून डांबरीकरण रस्ता कामास सुरुवात करण्यात आली आहे. [ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी त्यांच्या आमदार निधीतून प्रिती मेडीकल ते स्मशानभूमी पर्यंत डांबरी रस्ता मंजूर केला असून आज दिनांक १७/०३/२०२२ रोजी रस्त्याचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार होते.[ads id="ads2"]
परंतू आमदार चंद्रकांत भाऊ पाटील हे मुंबई येथे विधानसभेच्या अधिवेशन निमित्त मुंबई गेले असल्यामुळे त्यांच्या आदेशानुसार मा. प.स. सदस्य रवींद्र महाजन यांच्या हस्ते ऐनपुर गावांतर्गत रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन श्रीफळ फोडून कुदड मारुन जेष्ठ शिवसैनिक व आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे निकटवर्तीय छोटू पाटील (रेंभोटा) यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
या भुमीपुजन कार्यक्रमाला ऐनपुर नगरीचे प्रथम नागरिक सरपंच अमोल भाऊ महाजन अतुल पाटील रवींद्र महाजन , कैलास पाटील, सुनील महाजन ,प्रल्हाद पाटील, सुनील वंजारी, राजेंद्र पाटील, विनोद कपले, मोहन कचरे, जितेंद्र पाटील, किशोर पाटील, किरण पाटिल, अशोक पाटील, वासुदेव पाटील , पृथवीनाथ कोळी, सतीश अवसरमल विनोद महाजन, तुषार कचरे, निलेश महाजन, गोविंद पाटील सुभाष महाजन व ऐनपुर नगरीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

