जागतिक महिला दिनानिमित्त मोरगाव खुर्द येथे किशोरवयीन मुलींना आरोग्य शिक्षण व मार्गदर्शन शिबीर संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) जागतिक महिला दिनानिमित्त श्री .जे.के.पाटील. पब्लिक वेल्फेअर सोसायटी इंदोर व महिला पर्यावरण सखी मंच तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोड यांच्या संयुक्त विद्यमाने मोरगाव खुर्द येथे किशोरवयीन मुलींना आरोग्य शिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.[ads id="ads1"] 

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल चव्हाण मॅडम डॉ.शिवराय पाटील सर डॉ.अनुपम अजलसोंडे सर तसेच आर के एस के काउन्सिलर डॉ.संदीप कोळी सर ,आरोग्य समुदाय अधिकारीडॉ.अशोक अजलसोंडे व डॉ.माधवी वाघोदे महिला पर्यावरण सखी मंच जिल्हाध्यक्षा व किलबिल अकॅडमी स्कुल च्या प्राचार्या सौ नयना निलेश पाटील मॅडम, आरोग्यसेविका एस.पी. ढालवाले मॅडम आरोग्य सेवक भालेराव सर फार्मासिस्ट वैभव कोळी उपस्थित होते.[ads id="ads2"] 

   तसेच कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत महिला सदस्या ,किशोरवयीन मुली व गावातील माताभगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली कार्यक्रमाच्या अध्यक्षा आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.शीतल चव्हाण मॅडम यांनी किशोरवयीन मुलींना आरोग्याचा मूलमंत्र अंगीकारायला सांगितला तसेचआरोग्य च्या प्रश्नां विषयी मार्गदर्शन केले तसेच माननीय ना.जि. प.अध्यक्षा सौ रंजना ताई पाटील यांनीकार्यक्रमाच्या वेळी व्हिडीओ कॉल द्वारे उपस्थिती दिली व जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला मेडिकल ऑफिसर डॉ शिवराय पाटील सर यांनी विद्यार्थिनींना समतोल आहाराविषयी मार्गदर्शन केले व डॉ. माधवी मॅडम यानिकिशोरवयीन मुलींना मासिक पाळी विषयी मार्गदर्शन केलेमहिला पर्यावरण सखी मंच च्या जिल्ह्याध्यक्षा तसेच किलबिल अकॅडमी स्कुल च्या प्राचार्या सौ नयना पाटील मॅडम यांनी आपल्या मनोगतात मुलींनी आपल्या शारीरिक भावनिक व मानसिक आरोग्याकडे ही लक्ष द्यावे मनात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न ठेवता सक्षम व्हावे असे आव्हान केले श्री जे के पाटील पब्लिक वेलफेअर सोसायटीचे चेअरमन श्री आर एस पाटील सर यांच्या वतीने किशोरवयीन मुलींना मोफत सेनेटरी नेपकीन चे वाटप करण्यात आले तसेच रक्ततपासणी कॅम चे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन आशा वर्कर सौ जयश्री पाटील,वंदना येउलकर व सविता वाघोदे यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ.सी आर पाटील हायस्कूल चे प्राचार्य श्री सुरेश पाटील सर ,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जयश्री पाटील मॅडम यांनी केले यावेळी शाळेची विद्यार्थिनी कु.महिमा महाजन हिने कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच हायस्कुल शिक्षिका सौ कल्पना सपकाळ मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!