कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जि. प. शाळा बलवाडी येथील श्री. प्रभाकर गंभीर पाटील, श्री. ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जि. प. शाळा बलवाडी येथील श्री. अरविंद रघुनाथ पाटील व श्री. बा. ना. पाटील विद्यालयातील सौ. रिता विजय चौधरी यांनी शिबिरार्थींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. [ads id="ads2"]
यावेळी साक्षी अमोल पाटील, साक्षी दीपक कोळी, चैताली दत्तात्रय सुतार व भारती काशिनाथ पाटील या विद्यार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताब पटेल या विद्यार्थ्याने तर आभारप्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जयंत नेहेते यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जयंत नेहेते, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. बी. पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. रेखा पाटील, श्री. गोपाळ महाजन, श्री नितिन महाजन, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

