मुक्तळ (Muktal Taluka Bodwad) येथील ग्रामपंचायत सदस्य असलेले शिवाजी गोकुळ पारधी (Shivaji Gokul Paradhi) हे गेल्या तीन-चार दिवसांपासून घरून काही न सांगता निघून गेले होते. चार दिवस होऊनही शिवाजी घरी न परतल्याने भाऊ सुनीलने बोदवड पोलिसात (Bodwad Police) तो हरवल्याची तक्रार दिली होती. रविवारी रात्री अज्ञात फोनमुळे पोलिसांना नाल्यात मृतदेह पडला असल्याची माहिती मिळाली.[ads id="ads2"]
रात्रीचा काळोख व घटनास्थळी उजेड नसल्याने पोलिसांनी मृतदेह बॅटरीच्या साह्याने शोधला व ताब्यात घेतला. ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) आणले असता त्याचा गळा धारदार हत्याराने चिरल्याचे लक्षात आले. मृतदेह निरखून पाहिला असता तो मुक्तळ येथील हरवलेला शिवाजी पारधी याचा असल्याचे लक्षात आले.
नातेवाइकांचा आक्रोश
पोलिसांनी तत्काळ मयताच्या भावाशी संपर्क साधला. कुटुंबीयांनी मृतदेह पाहिला असता एकच हंबरडा फोडला. मुक्तळ (Muktal Taluka Bodwad) येथील एका युवतीवर शिवाजीचे प्रेम होते असे कळताच पोलिसांनी मुक्तळ (Muktal Taluka Bodwad) गाठले व संशयित रविना उर्फ धनश्री सचिन कोल्हे (२१), सचिन श्रीधर कोल्हे (३२) श्रीधर रामधन कोल्हे (५९), अमोल श्रीधर कोल्हे (३०), नितीन भास्कर कोल्हे (३२), निर्मलबाई श्रीधर कोल्हे (५९), सर्व राहणार मुक्तळ तसेच पुंडलिक यशवंत वारके (४९), पल्लवी पुंडलिक वारके (३६) दोघे राहणार शिंदी, ता. भुसावळ, तर एका अल्पवयीन बालिकेचा ताब्यात घेतले. आरोपींना न्यायलयाने ११ मार्च पर्यंत कोठडी सुनावली आहे.






