ऐनपूर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग , महाराष्ट्र शासन, सरदार व. पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर आणि संत गाडगेबाबा महाविद्यालय, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिलादिनी ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली. [ads id="ads1"]
कार्यशाळेचे उद्घाटन प्रा.डाॅ संतोष चव्हाण , सहसंचालक उच्च शिक्षण, जळगाव यांनी केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी शासनातर्फे स्त्री विकासासाठी मौलिक पावले उचलली आहे स्त्रियांसाठी विविध योजना शासनामार्फत राबविण्यात येतात पण त्यापासून अनेक स्त्रिया वंचित आहे.[ads id="ads2"]
त्यांच्यापर्यत या योजना पोहीचविण्या चे कार्य केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रमुख वक्ता डॉ. अमिता निरव नाव्हेलीस्ट इंदोर यांनी स्त्री वाद जरुरतें और चुनौतिया या विषयावर मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शनात त्यांनी स्त्री वादाचा अर्थ, स्त्री वादात अपेक्षित असलेल्या बाबी, वेगवेगळ्या देशातील स्त्रियांची स्थिती, त्यांना करावा लागलेला संघर्ष याचा आढावा सादर केला. स्त्रियांचे कुटूंबात सर्वात जास्त शोषण होते असे त्या म्हणाल्या.
स्त्रियांसमोरील आव्हानाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. जे. बी. अंजने, ऐनपूर महाविद्यालय आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले मतदानाच्या कार्यात सर्व स्त्रियांनी सहभाग घ्यावा. स्त्री ही अबला नसून सबला आहे स्त्री घराची शान आहे तिला कमी लेखू नका. कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. आर. पी. जोशी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले स्त्री विकासावर राष्ट्र विकास अवलंबून आहे म्हणून स्त्रीयांचा विकास झाला पाहिजे स्त्रीच्या प्रतिमे वरून त्या देशाची प्रतिमा कळते.
प्रस्तुत कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. पूजा कुमावत हिने केले पाहुणे परिचय डॉ. सुधीर शर्मा यांनी केला, आभार डॉ. पूनम त्रिवेदी यांनी मानले सूत्रसंचालन प्रा. डॉ. नीता वाणी यांनी केले डॉ. विवेक जोशी यांनी सहकार्य केले डॉ. संदीप साळुंखे यांनी तंत्र सहाय्यक म्हणून कार्य केले कार्यशाळेस ३०२ विद्यार्थी, प्राध्यापक, नागरिक उपस्थित होते.

