ऐनपुर परीसरात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल) ऐनपुर परीसरात दि. ०७/०३/२०२२ रोजी रात्री अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.[ads id="ads1"] 

सविस्तर वृत्त असे की , हवामान खात्याने तीन ते चार दिवसांपासुन अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून ऐनपुर परिसरातील निंबोल, विटवा, सुलवाडी , कोळदा ,धामोडी , कांडवेल , वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे या गावातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.[ads id="ads2"] 

   साधारणतः काल दि. ७ मार्च रोजी रात्री ११ च्या सुमारास ऐनपूरसह परिसरातील गावांमध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे हरभरा , गहू , मका इत्यादी पिकांचे नुकसान झाले. जोरदार वाऱ्यामुळे परिपक्व झालेल्या गहू , हरभरा व मका या पिकांचे नुकसान झाले. ऐनपूर परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या पिकांची लागवड केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला असून शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. या अवकाळी पावसामुळे इतरही रब्बी पिके वाया गेली आहे. 

 हेही वाचा :- रावेर येथील माऊली हॉस्पिटलच्या महिला डॉ. योगीता पाटील यांनी तरुणावर केले भररस्त्यात उपचार ; महिला डॉक्टरांचा चहूकडून शुभेच्छांचा वर्षाव 

 ज्या शेतकऱ्यांनी गव्हाची व हरभऱ्याची पेरणी केली आहे ती पिके आडवी पडली आहेत. खरीप पिकांची कसर रब्बी पिकांमध्ये निघेल या आशेवर शेतकरी होता. पण या अवकाळी पावसाच्या आगमनामुळे केळी, गहू , हरभरा , मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. म्हणून या नुकसानांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यायला हवी. अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे शासन या नुकसानग्रस्तांना मदत करेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!