चिनावल येथील वृद्ध महिलेच्या घराला आग;संसारोपयोगी साहित्य जळून खाक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 चिनावल येथील वृद्ध महिलेच्या घराला आग;संसारोपयोगी साहित्य जळून खाक

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील चिनावल (Chinawal Taluka Raver) येथील वाणी गल्लीत राहणाऱ्या अनुसयाबाई बळिराम भंगाळे या वृद्ध महिलेच्या घराला शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास आग लागली. गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत या वृद्ध महिलेच्या घरातील संसारोपयोगी साहित्यासह चार हजारांची रोख रक्कमही जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु  वृद्ध महिलेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.[ads id="ads1"] 

रावेर तालुक्यातील चिनावल(Chinawal,Taluka Raver)  येथील वृद्ध महिला सकाळी सकाळी आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गॅस पेटवत होती. तेव्हा अचानक शेगडीवर जाळ झाल्याने वृद्ध महिला घाबरून खाली येत आग लागल्याची माहिती दिली. तोपर्यंत आगीने मोठे स्वरूप घेऊन संपूर्ण घराला वेढले. यात संसारोपयोगी साहित्य, चार हजार रुपये रोख, धान्य जळून खाक झाले. दरम्यान, आगीची माहिती शेजारी व गावकऱ्यांना माहिती होताच गावकऱ्यांनी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्ती चे प्रयत्न केले. [ads id="ads2"] 

यावेळी सावदा नगरपालिका (Savada Municipal Corporation) अग्निशमन दलाचा बंब तत्काळ घटनास्थळी पोहोचला व आग आटोक्यात आणली. चिनावल येथील कमलाकर कुरकुरे, निखिल कुरकुरे, तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बोरोले, योगेश भंगाळे, सचिन खारे, दिलीप खारे, हर्षल सरोदे, जयंत पाटील, शेख इरफान माजी कुतुबुदीन, माधव भंगाळे, विनोद नेमाडे व ग्रामस्थांनी यावेळी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. 

हेही वाचा :- अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविल्याने जळगावातील दोन युवकांचा मृत्यू

यावेळी सावदा नगरपालिका  (Savada Municipal Corporation) अग्निशमन दलाचे लाला चौधरी, बापू नेमाडे यासह शेजारील नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. अद्यापपावेतो आगीचा पंचनामा अथवा पोलीस नोंद झालेली नव्हती,

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!