सविस्तर वृत्त असे की, जळगावातील (Jalgaon) परवेज निसार खाटीक (वय २२, लक्ष्मीनगर, जळगाव ) आणि आमीर जाकीर खाटीक (वय २२, उस्मानिया पार्क ) हे भुसावळ(Bhusawal) येथे कामानिमित्त गेले होते.[ads id="ads1"]
सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दूरदर्शन टॉवरच्या (Doordarshan Tower) समोरच्या अरूंद रोडवर त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात परवेज हा जागीच ठार झाला. तर, गंभीर जखमी झालेल्या आमीर याला जळगाव जिल्हा रूग्णालयात (Civil Hospital Jalgaon) दाखल करण्यात आले. मात्र उपचार घेत असतांना त्याने शेवटचा श्वास घेतला.[ads id="ads2"]
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच दोन्ही तरूणांच्या आप्तांनी जळगाव जिल्हा रूग्णालयाकडे (Jalgaon Civil Hospital) धाव घेतली. आप्तांच्या आक्रोशाने वातावरण गंभीर बनले असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
हेही वाचा :- चिनावल येथील वृद्ध महिलेच्या घराला आग;संसारोपयोगी साहित्य जळून खाक
तर या तरूणांच्या दुचाकीने उडविल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन केले असून पोलिसांनी (Police) त्याचा शोध सुरू केला आहे.


