रावेर रेल्वे स्टेशन येथून कानपूरसाठी रवाना होणाऱ्या रेल्वेच्या केळी वॅगनला माझ्या हस्ते हिरवी झेंडी देऊन शुभारंभ करण्यात आला.रावेर केळीचे माहेरघर असून १९७० पासून उत्तर भारतात रेल्वेद्वारा केळी बाजारपेठेत पाठविली जात असे; परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर रेल्वे वाहतूक सात वर्षांपासून बंद होती. खा. रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने सदर सुविधा पुन्हा सुरू करण्यात आलेली असून आज दि.२६ रोजी कानपूर उत्तरप्रदेश येथे विक्री करण्यासाठी केळी रॅक रवाना करण्यात आला. [ads id="ads1"]
पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या विकासासाठी असलेल्या विचारात शेतकऱ्यांचे हित अग्रस्थानी असून शेतकरी हा स्वतः आपल्या मालाचा व्यापारी व्हावा यासाठी मोदी सरकार मार्फत "किसान रेल्वे" सुरू करण्यात आली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ उचलण्याचे आवाहन यावेळी केले. सदर रावेर येथून सुरू करण्यात आलेल्या केळी वॅगन मुळे केळी उत्पादक शेतकऱ्याचे प्रती क्विंटल वाहतूक भाड्यामागे ४०० रुपये वाचणार आहे.[ads id="ads2"]
यावेळी खा.रक्षा खडसे यांच्यासह केळी उत्पादक महासंघाचे माजी अध्यक्ष भागवत पाटील, माजी जि.प.सभापती श्री.सुरेश धनके, जि.प.सदस्य श्री.नंदकिशोर महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.पद्माकर महाजन, श्री.प्रल्हाद पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, तालुकाध्यक्ष श्री.राजन लासुरकर, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, प.स.सदस्य श्री.जितू पाटील, श्री.संदीप सावळे, पी.के.महाजन, तालुका सरचिटणीस सी.एस.पाटील, रावेर शहराध्यक्ष दिलीप पाटील, शुभम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले तर आभार ऍड चंद्रदीप पाटील यांनी मानले. यावेळी शेतकरी मंडळाचे पदाधिकारी, किशोर गणवाणी, रविंद्र पाटील, मोहन पाटील, संजय अग्रवाल,धोंडु पाटील, संजय पाटील, सुरेश गणावाणी, संजय चौधरी, विकास महाजन, किशोर पाटील, सतीष पाटील, नितीन गणवाणी, हरिभाऊ पाटील, गंभीर पाटील, विनायक महाजन, ए.आर.पाटील यांच्यासह सर्व सदस्य तसेच रेल्वेचे नावेद शेख, श्री.मिश्रा, मनोज श्रावक, विकास अवसरमल, संतोष पाटील, वासुदेव नरवाडे व कार्यकर्ते उपस्थित होते.


