रावेर तालुक्यात वाळू चोरी विरोधी पथकांनी नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन करून वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांचे कडून दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत करण्यात आले आहे. [ads id="ads2"]
परंतु उक्त वाहनाचे मालक यांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम शासन जमा केलेली नसल्यामुळे अशाप्रकारची वाहने लिलावाद्वारे विक्री करून दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसुल करणेकामी दि. २८ मार्च २०२२ रोजी सकाळी ११.०० वा तहसिल कार्यालय रावेर येथे जप्त केलेल्या वाहनांचे लिलाव करण्यात येत आहे.
तरी जास्तीत जास्त ईच्छुक व्यक्ती/संस्थांनी लिलावात भाग घ्यावा, लिलावातील अटी व शर्ती, लिलावात असलेली वाहने. लिलावात पतची किंमत इ. बाबत कार्यालयीन वेळेत तहसिलदार रावेर यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे.


