रावेर येथील श्री.व्ही.एस नाईक महाविद्यालयात "राष्ट्रीय परिसंवाद" संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे
रावेर येथील श्री.व्ही. एस.नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यपीठच्या सहकार्याने दिनांक-27/03/2022 रविवार रोजी Recent Senerion In Humanities after Covid -19 या विषयावर एकदिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.[ads id="ads1"] 

  या राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे प्र. कुलगुरु डॉ.एस.टी.इंगळे यांचा हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मानवविद्याशाखाचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.प्रमोद पवार हे उपस्थित होते.या परिसंवादाचे अध्यक्ष महाविद्यालयातचे प्राचार्य डॉ.पी.व्ही.दलाल हे होते.या परिसंवादात बीजभाषण प्रो. डॉ.प्रवीण सप्तर्षीं ( सेलिसबरी विद्यापीठ ,अमेरिका ) यांनी केले. हा परिसंवाद तीन सत्रात घेण्यात आला. [ads id="ads2"] 

  ज्यामध्ये डॉ.अपर्णा अष्टपुत्रे (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद) यांनी कोरोनाचे मानसिक आरोग्यवरील परिणाम या विषयावर सवांद साधला. तर दुसरे विचार पुष्प डॉ.बीरेंद्र झंझरीया (गौल्हेर ,मध्यप्रदेश) यांनी डाएट आणि आहार या विषयावर आपले विचार मांडले.तिसरे विचार पुष्प प्रो. डॉ. मारोती घुगे (संत रामदास महाविद्यालय, घनसावंगी जि.जालना ) यांनी कोरोना आणि साहित्य या विषयावर आपले विवेचन केले. या राष्ट्रीय परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ.गणपतराव ढेबरे व प्रा.मनोहर तायडे यांनी केले. 

  आभार प्रा.एस.बी. धनले यांनी मानले. मार्गदर्शकांचा परिचय डॉ.संतोष गव्हाड, प्रा.चतुर गाढे, डॉ.बी.जी. मुख्यदल यांनी करून दिला.या राष्ट्रीय परिसंवाद करीता महाराष्ट्र व वेगवेगळ्या राज्यातून 170 प्राध्यापक, संशोधक, विदयार्थी यांनी नोंदणी केली होती.हा परिसंवाद यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ.व्ही.बी.सूर्यवंशी, IQAC समन्वक डॉ.एस.आर.चौधरी क्रीडा संचालक प्रा.उमेश पाटील, डॉ.चांद खान तसेच राष्ट्रीय परिसंवाद चे समन्वक प्रा. संदीप धापसे, प्रा.चतुर गाढे श्री.युवराज बिरपन यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!