मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव (Naigaon Taluka Muktainagar) येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, रात्री आठ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे नदीपात्रात महिलेचा मृतदेह आला.[ads id="ads1"]
ग्रामस्थांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली असून पोलिसांनी (Police) तपास चक्र फिरवत चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, या महिलेने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला याबाबतची कोणतीही माहिती मिळाली नसून पोलीस तपासातून या बाबी लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. [ads id="ads2"]
या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसात (Police) याची नोंद करण्यात आली आहे. तर संबंधीत महिलेची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. नायगाव (Naigaon Taluka Muktainagar) येथील नदीपात्रात महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती कळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


