चोपडा (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशान्वये,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या सूचनेनुसार प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असून ऍंड बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरावर कार्यकर्त्यांच्या बैठकीचे नियोजन सुरू केलेले आहे ,उपेक्षित, वंचित घटकांसाठी भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना द्वेष भावनेचे राजकारण करीत असून या घटकाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी कोणतेही ठोस धोरण नसून हे एकाच माळेचे मणी आहेत.[ads id="ads1"]
जेव्हा यांच्या हातातील सत्ता जायची वेळ येते तेव्हा हे चारही पक्ष नैतिकता विसरून बहुजन समाजाला दिलेल्या शब्दाला न जागता आर्थिक फायद्यासाठी एकत्र येतात, हे चारही पक्ष उपेक्षित वंचित बहुजन घटकाला न्याय देऊ शकत नाही, एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली फक्त वंचित बहुजन आघाडी न्याय देऊ शकते असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जिल्हा प्रभारी रविकांत वाघ यांनी शासकीय विश्रामगृह चोपडा येथे वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर भाषणात केले.[ads id="ads2"]
यावेळी जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी विनोद सोनवणे यांनी अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणूकित झालेल्या सत्ता स्थापनेसाठी झालेल्या घोडे बाजार हे सर्व पक्ष वंचित बहुजन आघाडीला दूर ठेवण्यासाठी एकत्र आले यावरून कार्येकर्त्यांनी बोध घेतला पाहिजे मनोगत व्यक्त केले याप्रसंगी जिल्हा संघटक राजेंद्र बारी, जिल्हा कामगार सरचिटणीस बालाजी पठाडे, रुपेश भालेराव ,समाधान सपकाळे,प्रविण निकम यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी युसूफ तेली सह कार्यकर्ते यांनी जिल्हा प्रभारी रविकांत वाघ व जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या हस्ते प्रवेश केला .
यावेळी शाम नगराळे,सचिन पाटिल, देवदत्त मकासरे, कुणाल सुरडकर, विजय मालविय,सचिन बारी सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

