रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर शहरातील (Raver City) एका गोठ्यातून बैल व वासरी चोरी प्रकरणी रावेर शहरातीलच दोन जणांना अटक करण्यात रावेर पोलिसांना (Raver Police) यश आले आहे.
रावेर स्टेशन रोडवर (Station Road) एका पेट्रोल पंपानजिक रावेर नगरीचे माजी नगराध्यक्ष हरीष गनवानी यांच्या रावेर येथील राहत्या घराच्या मागील बाजूस त्यांच्या मालकीचा गुरांचा गोठा आहे.[ads id="ads1"]
या गोठ्यातून दिनांक २७ फेब्रुवारी ते १० मार्चच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी ४० हजार रुपये किंमतीचा एक बैल व २० हजार रुपये किंमतीची एक जर्सी जातीची बासरी चोरुन नेली होती.[ads id="ads2"]
याबाबत रावेर पोलीस ठाण्यात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे (रावेर PI Kailas Nagare) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुरेश मेढे(Police Naik Suresh Medhe) पो.काँ. समाधान ठाकूर, विकार शेख, प्रमोद पाटील, अमोल जाधव यांच्या पथकाने या चोरी प्रकरणी आरोपी शकिल सलीम शेख (वय २७) रा. कुरेशी वाडा, अशपाक गफ्फार शेख (वय २३) पाण्याच्या टॉकी (Water Tank) जवळ रावेर या दोघांना अटक केली. तपास पो.ना. महेंद्र सुरवाडे करीत आहे.

