ऐनपुर प्रतिनिधी :- विजय एस अवसरमल
रावेर तालुक्यातील विटवे येथे समाज समता संघ राष्ट्रीय संघ प्रमुख व काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये ( आय ए एस . ) यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष पवार, पंकज कोंधे या प्रमुख कार्यकर्त्यांन सह असंख्य युवक पुरुष व महिला यांनी काँगेसच्या घ्यैय धोरणावर विश्वार ठेवुन काँग्रेस पक्षात प्रवेश केला . यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा पवार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.[ads id="ads1"]
समाज समता संघ राष्ट्रीय संघ प्रमुख किशोर गजभिये यांनी समाज समता संघ ही गैर राजनैतिक संघटना 4 सप्टेंबर 1927 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली असुन या माध्यमातून समाज परिवर्तनाच्या लढाईची सुरुवात झाली आहे.[ads id="ads2"]
आता चे मोदी सरकार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्य घटना बदलविण्याचे कट कारस्थान करीत असुन त्यांचा हा डाव रोखायचा असेल तर काँग्रेस पक्षाला ताकद देणे हा एकमेव उपाय आहे त्यासाठी समाज समता संघ काँग्रेसला वाढविण्याचे कार्य करीत आहे असे यावेळी बोलतांना सांगितले.आ.शिरीषदादा चौधरी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना केव्हा ही आवाज दया काँग्रेस पक्ष व मी आपल्या सोबत आहे असे सांगीतले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकींचा निकाल हा ईव्हीएम मशिनचा चमस्कार आहे . भाजपाला लोकांनी पुर्णपणे नाकारले असुन तरी पण त्यांचा विजय होतो . याचा विचार सामान्य जनतेने करावा .काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी देवुन जास्तीत जास्त लोकांनी काँगेसचे ऑनलाइन क्रियाशिल सभासद व्हावे असे आवाहन केले . विचार मंचकावर रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्षडॉ. जगदीश पाटील जेष्ठ नेते एस.ए भोई सर दिनेश पाटील ता . अध्यक्ष मुक्ताईनगर , राजु सवर्णे जि . कार्यध्यक्ष दिलरुबाब तडवी आदिवासी नेते ॲड. योगेश गजरे , लहासे डॉ. रोटे ॲड राहुल पाटील यांचे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .

