यामुळे १४ मार्चपासून १५ पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्तीचे आदेश काढले आहे. गटविकास अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहतील. तर जिल्हा परिषदेची (Jalgoan ZP) पदाधिकाऱ्यांची मुदत २० मार्चला पूर्ण होत आहे. त्यावर २१ मार्चपासून प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया (Pankaj Aashiya) सूत्रे हाती घेतील.[ads id="ads2"]
कोरोनाची (Corona) तिसरी लाट संपली असली तरी रुग्ण काही प्रमाणात आढळत आहेत. यामुळे या निवडणुका वेळेत होणार की लांबणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. राज्य शासनाने नुकतीच पालिका वॉर्डांची हद्दवाढ केली होती. त्यात पालिकांची वॉर्डसंख्या वाढली. त्या धर्तीवर ग्रामीण भागातही मतदारसंख्या वाढल्याने (Zilha Parishad) जिल्हा परिषद व पंचायत समिती गट, गणांची फेररचना करावी, हद्दवाढ करावी अशी मागणी झाली होती.
सप्टेंबरनंतरच निवडणूक होण्याची शक्यता
ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरून जिल्हा परिषदेची निवडणूक सहा महिन्यासाठी पुढे ढकलली जाणार आहे. असे असले तरी प्रत्यक्षात १० गट वाढणार आहे. मात्र आरक्षणाबाबत सर्वच गटांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून, नवीन इच्छुकांमध्येदेखील निवडणूक लढवायची की नाही याबाबत मोठा संभ्रम आहे.

