जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) येथील शब्दसत्य निर्मित "देशभक्त जेठमल सारस्वत" या मराठी आणि हिंदी डॉक्युमेंटरी फिल्म चे प्रकाशन आज दिनांक 23 मार्च 2022, बुधवार रोजी शहीद दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.[ads id="ads1"]
जळगाव येथील देशभक्त जेठमल सारस्वत यांनी ब्रिटिश काळात चंद्रशेखर आझाद आणि शहीद भगत सिंग यांच्याबरोबर काम केले होते. या त्यांच्या कार्याची माहिती महाराष्ट्राबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी, या उद्देशाने या डॉक्युमेंटरी फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. ही डॉक्युमेंटरी फिल्म SHABDASATYA (शब्दसत्य) या यूट्यूब चैनल ला पाहता येईल.[ads id="ads2"]
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून देशभक्त जेठमल सारस्वत यांचे नातू व डॉक्युमेंटरी फिल्मचे निवेदक पुरुषोत्तम सारस्वत होते. तसेच श्रीपाद सारस्वत, एडवोकेट प्रवीण पांडे, प्रा. जगदीश बियाणी, सुरेश पांडे, विलास तायडे, रतनकांत पवार, कुमार अंश रंधे, विजय सैंदाणे, फोटोग्राफर संदीप बाविस्कर, सुभाष सपकाळे हे ही मंडळी उपस्थित होती.
या डॉक्युमेंटरी फिल्म चे दिग्दर्शन आनंद ढिवरे यांनी केले आहे.



.jpg)