अनियमिततेचा ठपका ठेवत रावेर तालुक्यातील आभोडा ग्रामसेवक निलंबित

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) रावेर तालुक्यातील आभोडा बुद्रुक (Abhode Bk Taluka Raver) येथील ग्रामसेवक (Gramsevak) गणेश रामसिंग चव्हाण यांनी बेजबाबदारपणे दैनंदिन कामकाजात केलेल्या अनियमिततेमुळे रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल (Raver Panchayat Samiti BDO Dipali Kotwal) यांनी १० मार्च रोजी जि.प. सेवेतून निलंबित करीत असल्याचे आदेश पारित केले आहे.[ads id="ads2"] 

   या आदेशात त्यांनी स्पष्ट केले आहे की. ग्रामपंचायतीत (Grampanchayat) सतत गैरहजर राहणे, ग्रामपंचायतीच्या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्याबाबत सरपंच (Sarpanch) , उपसरपंच (Upsarpanch) व ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांच्या प्राप्त तक्रारी पाहता, घरकुल योजना राबविताना हलगर्जीपणा करणे.

हेही वाचा :- रावेर ते वाघोडा रेल्वे स्थानकादरम्यान १६ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला 

 वारंवार लेखी नोटीस देऊनही खुलासा सादर न करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, ग्रामपंचायतीत नियमित उपस्थित न राहणे, आदी कारणांनी निलंबनाचे आदेश पारित केले आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!