बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धम्म ते समजु लागले.महार हजारो वर्षापासून ढोंगी वर्णव्यस्थेच्या उखळात भरडुन निघाला .गावाचे रक्षण करणारा हा शुर समाज गावातील लोकांसाठि अस्पृश्य होऊन बसला. . चोर डाकु ,आणि हिस्र श्वापंदापासून गावाचे रक्षण करण्यासाठी हा वेशीवर आला .आणि वेशीचाच झाला .[ads id="ads2"]
या समाजासाठि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे मुक्तीदाते ठरले बाबासाहेबांना लहानपणापासून वर्णव्यवस्थेचे चटके बसलेले.होतेच.
बाबासाहेबांनी दिक्षादिल्यानंतर अस्पृश्य समाजातील प्रत्येक जातीने बौद्ध धम्म स्विकारला नाही.प्रामुख्याने महार समाजानेच तो स्विकारला.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात जास्त भर नेहमीच शिक्षणवर होता.त्यांनी स्वतः देखील जेवढ्या पदव्या संपादन केल्या होत्या की, त्याकाळी देखील एवढ्या पदव्या कोणी घेतल्या नाहीत, आणि भविष्यात देखील घेणार नाहीत. शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा . असा मुलमंत्र बाबासाहेबांनी दिला .महार समाजाने हा मंत्र प्राणापेक्षाही . अधिक जपला . घरी कधी मिठ भाकर खाऊन मुला बाळांना शिंकवू लागला .मुले शिंकू लागली महारवाडा आता बौद्धवाडा झाला . गावातील इतर समाजातील मुलापेक्षाही शिक्षणाची टक्केवारी बौद्धवाड्यातच वाढु लागली .मुलांनी शिक्षण घेतले तरी अस्पृश्यतेचा भेदभाव कमी झाला नाही . आता हाच बौद्धयुवक सज्ञान झाला . शिक्षणाचे चीज करण्यासाठी गांव सोडु लागला . शहराकडे धाव घेतली. गाव सोडा शहराकडे चला , असे बाबासाहेबांनी भाषणातुन अनेकदा सांगितले होते .
साहित्य , चळवळ , आंदोलन , राजकारण , शिक्षण , समाजकारणासह अनेक क्षे त्रात त्यांनी झेंडा रोवला .शहरातील झोपडपट्यावरील घरे आता एकमजली - दुमजली होऊ लागली . सत्तासंघर्षासाठि संघर्ष होऊ लागला .पुर्वाश्रमीचा महार आता बौद्ध झाला.
पण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यात न घेता डोक्यावर घेऊन नाचन्यातच तो धन्यता मानू लागला.
"ज्या समाजात १० डॉक्टर,२०इंजीनियर, ३० वकील निर्माण होतील त्या समाजाकडे कुणाचीही डोळे उचलून पाहण्याची हिंमत होणार नाही" असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलेच आहे.आज समाजात लाखो डॉक्टर,इंजीनियर,आणि वकील आहेत.मात्र समाजाकड़े वाकड्या नजरेने बघण्याचे काम बंद झालेले नाही.
कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणने होते,
जेव्हा समाजात१०डॉक्टर,२०इंजीनियर,३०वकील तयार होतील आणि समाजावर अन्याय होईल त्या वेळेस हे प्रभुत्वशाली लोक शांत बसणार नाहीत,ते या अन्यायाचा विरोध करतील,प्रतिकार करून समाजासाठी झटतील.
प्रत्यक्षात मात्र असे घडले नाही. तर या शिकल्या सवरल्या लोकांनी सार्वजनिक जीवनात अथवा अशिक्षित समाजाचे नेतृत्व करीत असतांना निस्वार्थी भूमिका घेतली नाही.
अर्थात सार्वजनिक जीवन जगत असताना नेत्याचे, कार्यकर्त्यांचे जीवन हे खुल्या आरश्याप्रमाणे असावे.त्यामुळे आपण आपले आचरण लपवण्याचा प्रयत्न जेव्हा करत असतो तेव्हा तितक्याच प्रखरतेने समाज आपल्याकडे बघत असतो.म्हणूनच तर नेतृत्वाचे अथवा कार्यकर्त्यांचे सार्वजनिक जीवन हे उघड्या आरश्यासमान स्वच्छ आणि स्पष्ट असावे लागते.व्यवहार आणि आचरण हे सारखे असले पाहिजेत.
शिक्षणाचा उपयोग आपल्याच दीनदुबळ्या जनतेच्या उद्धारार्थ न करीता जर शिकून आपली नोकरी भली आहे.आपली बायकामुले भली या भावनेने आजचे तरुण वागणार असले तर त्याचा समाजाला क़ाय उपयोग होणार बाबासाहेब आंबेडकर म्हणतात चळवळीसाठी मला प्रामाणिक लोक हवे आहेत ज्ञानाची उणीव भरून काढण्याची माझी तयारी आहे सामाजिक कार्य करताना नाम के वास्ते काम करणारे लोक आहेत त्याच प्रकारे काम के वास्ते काम करणारेही लोक आहेत तेव्हा नाम के वास्ते काम करणाऱ्या लोकांना ते सांगतात की, "तुमच्यात असलेली मानापानाची वाईट भावना काढून टाकली पाहिजे माझे नाव आले नाही तर मी पुढे आलेल्या कार्याला विरोध करीन ही भावना अत्यंत वाईट आहे.समाजाशी प्रामाणिकपणे एकनिष्ठेने वागले पाहिजे.तरच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समाज रचना निर्माण होईल.
जयभीम! जय भारत
अॅड.राजेश वसंत रायमळे
९७६४७४२०७९


