सुवर्णमहोत्सवी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



धरणगाव प्रतिनिधी - पी डी पाटील सर

धरणगांव दि. १४ एप्रिल २०२२ गुरूवार रोजी सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.[ads id="ads1"] 

            सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी प्रास्ताविक केले. शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार यांच्या हस्ते विश्वरत्न , महामानव, परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील व्ही.टी.माळी सर यांनी बाबासाहेबांचा जीवनपट उलगडला, तलवारीच्या धारीपेक्षा कलमची धार श्रेष्ठ असते असे प्रतिपादन केले. [ads id="ads2"] 

           याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक एम.बी.मोरे, एस.व्ही.आढावे, हेमंत माळी, व्ही.टी.माळी,पी.डी.पाटील, अशोक पाटील तसेच शाळेतील शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

          कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!