माजी ग्रा.पं.सदस्याची आत्महत्या ; यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल प्रतिनिधी (किरण तायडे) कर्जबाजारीला कंटाळून माजी ग्रामपंचायत सदस्याने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे घडली असून या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.विक्रम लालू भिरूड (वय-५३)असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.[ads id="ads1"] 

डोंगरकठोरा येथील रहिवाशी विक्रम भिरूड हे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य होते.त्यांच्यावर कर्जाचे डोंगर असल्याने गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होते. बुधवारी १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास डोंगरकठोरा शिवारातील सातोद रस्त्यावरील दिलीप भिरूड यांच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली.[ads id="ads2"] 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांच्याह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आत्महत्या करण्यापूर्वी विहीरीच्या काठावर आपला चष्मा, शर्ट व चपल ठेवल्याचे दिसून आले.

गावातील ग्रामस्थांच्या व तरूणाच्या मदतीने अखेर विक्रम भिरूड यांचे मृतदेह विहीरीतुन काढून यावल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या संदर्भात मयताचे लहान भाऊ सुनिल भिरुड यांनी खबर दिल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!