महामानवाच्या पुतळ्यास अभिवादन
याप्रसंगी वरील मान्यवरांसह रीपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, लक्ष्मी मकासरे, जयंती समिती अध्यक्ष शरद सोनवणे, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे, रवी सपकाळे, पुरूषोत्तम नारखेडे आदींसह मान्यवरांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.[ads id="ads2"]
संविधान पुस्तकाच्या पाचशे प्रती वाटप
रीपाइं जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्यातर्फे संविधान पुस्तकाच्या पाचशे प्रतींचे रेल्वे एडीआरएम रुखमैय्या मीना, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व राजू सूर्यवंशी यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी रीपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शरद सोनवणे, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.सुनील नेवे, पुरूषोत्तम नारखेडे, रवी सपकाळे, लक्ष्मण जाधव, पप्पू सुरडकर, बाळू सोनवणे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे रीपाइं जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी सांगितले.


