सोळा वर्षांपासून फरार असलेला कैदी अखेर जेरबंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


खूनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेला कैदी पॅरोलच्या रजेचा गैरफायदा घेत फरार असलेल्या कैद्याला अखेर १६ वर्षांनंतर पुण्यातून अटक केली आहे.भगवान हिरामण सपकाळे (वय-५०, रा. दिनदयाल नगर, जामनेर रोड, भुसावळ) असे अटक केलेल्या कैद्याचे नाव आहे. त्याला पुणे येथील शिरूर येथून अटक केली आहे.[ads id="ads1"] 

याबाबत माहिती अशी की, भुसावळ बाजार पेठे येथे सन १९९७ मध्ये खुनाच्या गुन्ह्यात आरोपी भगवान सपकाळे याला शिक्षा झाली होती. त्याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असतांना २ जून २००६ रोजी त्याला पॅरोलची सुट्टी देण्यात आली होती. सुट्टी दिल्यापासून पुन्हा कारागृहात हजर न होता फरार झाला होता. यासंदर्भात भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात बंदी कैदी फरार झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.[ads id="ads2"] 

 गेल्या सोळा वर्षांपासून फरार असलेला कैदी हा पुण्यातील शिरूर येथे असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी माहितीच्य आधारे सहकारी पोलीस अंमलदार पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पो.ना. रणजित जाधव, पो.ना. किशोर राठोड, विनोद पाटील, चालक पो.कॉ. मुरलीधर बारी यांनी पुणे गाठले. सापळा रचून फरार कैदी भगवान सपकाळे याला अटक केली. पुढील कारवाईसाठी भुसावळ बाजापेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!