रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथिल माता रमाई महिला मंडळ व भिमालाय बहुउद्देशीय संस्था रावेर यांचे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलतांना आ.शिरीषदादा चौधरी यांनी वरील विचार मांडले. [ads id="ads1"]
पुढे बोलतांना ते म्हणाले की महापुरुषांच्या जयंत्या उत्साहात जरूर होणे आवश्यक आहे पण त्याच बरोबर अशा स्पर्धा आयोजित करून स्पर्धांच्या माध्यमातून महापुरुषांची पुस्तके वाचण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते त्यामुळे सुसंस्कृत पिढी घडायला चालना मिळते तेव्हा असे कार्यक्रम आयोजित होणे गरजेचे असुन आयोजकांचे मनापासून अभिनंदन करतो. [ads id="ads2"]
कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योगपती श्रीरामदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रतिमा पूजन जि. प. अध्यक्षा सौ रंजना पाटील, नगराध्यक्ष दारा मो. जफर मो., माजी नगराध्यक्ष हरिषशेठ गणवानी यांचे हस्ते करण्यात आले तर धूप पूजन मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे, माजी नगराध्यक्ष शितल पाटील, पद्माकर महाजन यांचे हस्ते करण्यात आले. यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष बौद्धांचार्य दिपक तायडे सर यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले. यानंतर निबंध स्पर्धेतील विजेते ठरलेल्या कु.स्वरांजली इंगळे ,सौ.तेजल तायडे, कु.प्रेरणा गजरे यांना आणि वक्तृत्व स्पर्धेतील विजेते प्रशिक तायडे भुसावळ, तनिष बोदडे, स्वरांजली इंगळे यांना रोख रकमेसह शिल्ड व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली.
सदरची बक्षिसे ऍड. आर. के. पाटील, ऍड. सुरज चौधरी, सौ. मानसी पवार, अमोल महाजन व सुनील महाजन यांचे तर्फे ठेवण्यात आली होती. याप्रसंगी श्रीरामदादा पाटील, ऍड. सुरज चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर नगराध्यक्ष दारा मो.जफर मो.,माजी नगराध्यक्ष शितल पाटील, पद्माकर महाजन, हरिषशेठ गणवानी, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजीव पाटील, निंभोरसिम सरपंच राजू सवर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष पंकज वाघ,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, गुणवंत सातव,अमोल महाजन आदी उपस्थित होते.
तर कार्यक्रमास गोकुळ तायडे सर, प्रा. चतुर गाढे, प्रा. सत्यशील धनले, वसंत वाघ, पत्रकार दिपक नगरे, पत्रकार शेख शकील, संतोष कोसोदे, केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे,पीपल्स बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक प्रकाश महाले, रमण तायडे सर, नगीन इंगळे सर, उमेश गाढे, दिपक तायडे सर, शे. गयास, गयासोद्दीन काझी, नरेश गजरे, शेख युसूफ, सोपान साहेबराव पाटील,डी. डी. वाणी, गोपाळ बिरपन,ऍड योगेश गजरे, ऍड सुभाष धुंदले, राजू वानखेडे, राजू गजरे,बाळू तायडे, गोविंदा लहासे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंजना गजरे, संचलन वर्षा इंगळे तर आभार अनिता गजरे यांनी केलेकार्यक्रम यशस्वीतेसाठी सोनाली वाघ, प्रीती तायडे, माया तायडे, संगीता रायमळे, उज्वला सुरदास, आशा महाले, सुनीता मेढे,निर्मला तायडे, रजनी सपकाळे, सुनीता वानखेडे, तेजल तायडे,उषा गजरे, पूनम गजरे,साक्षी सुरदास व भिमालाय संस्थेचे अध्यक्ष मेघराज शेगावकर यांनी परिश्रम घेतले.



