रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील अहिरवाडी (Ahirwadi)येथे दि.१४ रोजी सकाळी अचानक लागलेल्या आगीत १८ ते २० लाखाचे मंडपाचे साहित्य जाळून खाक झाले आहे. या ठिकाणी रावेर - यावल मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी (MLA Shirish Chaudhari) यांनी भेट देवून दुर्घटना ग्रस्त भागाची पाहणी केली. [ads id="ads1"]
रावेर तालुक्यातील अहिरवाडी (Ahirwadi Taluka Raver)येथील विविध कार्यकारी सह.सोसायटीच्या गोडावून मध्ये बाळकृष्ण महाजन रा.पाडळे (Padale Taluka Raver) यांचे मंडप साहित्य होते.त्या ठिकाणी बुधवारी रात्री १२.३० वाजेनंतर अचानक आग लागली होती,आगीचे लोळ बाहेर निघत असल्याने,शर्थीचे प्रयत्न गावकऱ्यांनी करून, आग आटोक्यात आणली.[ads id="ads2"]
त्यात मंडपाचे सर्व साहित्य जाळून खाक झाले आहे.आग कशामुळे लागली ते मात्रा समजू शकले नाही. याबाबत रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे (Raver Tahsildar Usharani Devgune) यांच्या सूचनेनुसार पंचनामा करण्यात आला आहे,यात सुदैवाने जिवीत हानी टळली आहे.



