दुचाकी अपघातातील आंदलवाडीच्या जखमी तरुणाची प्राणज्योत मावळली

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


सावदा प्रतिनिधी (समाधान गाढे)  रावेर तालुक्यातील आंदलवाडी (Andalwadi) येथील रहिवासी तथा भाजयुमो शाखाध्यक्ष तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजेदरम्यान सावदा ते पिंपरुड रस्त्यावर घडली. गणेश अशोक कोळी असे त्याचे नाव आहे. गणेश अशोक कोळी वय ( वय ३५) आणि विक्की सीताराम सोनवणे (रा. बामणोद ता. यावल हे कामानिमित्त भुसावळ येथे गेले होते.[ads id="ads1"] 

   काम आटोपून परत येताना सावदा ते पिंपरुड (Savada To Pimprud) रस्त्यावर त्यांची दुचाकी (एमएच १९ - डी. ए. ९५२०) आणि कारची (एमएच १९ बीजे.०३८२) या दोन वाहनांची धडक झाली. त्यामुळे दुचाकी सुमारे ४०० मीटरपर्यंत फेकली गेली. त्यात दुचाकीवरील गणेश व विक्की हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले. [ads id="ads2"] 

  अपघातानंतर मदतीसाठी रस्त्याने जाणारे सामाजिक कार्यकर्ते तुषार बोरसे बामणोद यांनी शासकीय रुग्णवाहिका बोलावून जखमींना उपचारासाठी फैजपूर येथील डॉ शैलेश खाचणे यांच्या दवाखान्यात नेले मात्र, गणेश कोळीची प्रकृती अधिक खालावल्याने त्यास जळगाव येथे खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. दुर्दैवाने तेथे त्याची प्राणज्योत मालवली. विक्की सोनवणे याच्यावर फैजपूर येथे उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. मृत गणेशच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुले असा त्यांच्या परिवार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!