रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) तालुक्यातील विटवे /सांगवे येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर 131वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी निंभोरा पोलिस उपनिरीक्षक आयु. गणेश धूमाळ साहेब व सरपंच भास्करराव चौधरी यांच्या हस्ते धुप पूजा व माल्यार्पण करण्यात आले.[ads id="ads1"]
यावेळी सदर कार्यक्रमात आयु. साहेबराव वानखेड़े, आयु. नरेंद्र वानखेड़े यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले,की महापुरुषांची जयंती साजरी करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या प्रमाणे 'माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा माझे राहिलेल अपूर्ण कार्य पुर्ण करा व त्यासाठी प्राणाचीबाजी लावा' व बहुजन समाजाच्या उत्थानासाठी ज्या महापुरुषानी कार्य केले त्यांचे विचार घराघरात पोहचवा यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष रवि अढागळे यांनी सूत्रसंचलन तर आभार सुरेश तायड़े सांगवेकर यांनी मानलेे.[ads id="ads2"]
यावेळी सांगवे समिती अध्यक्ष भगवान कोळी डॉ संदीप पाटील आयु. दादाराव कोळी (महाराज ) बिट हवालदार आयु. बापू पाटील विटवे /सांगवे, पोलिस पाटिल, बाळु पवार, वैशाली एकनाथ कोळी ग्रा.पं. सदस्य सौ. लक्ष्मीबाई साहेबराव वानखेड़े व समिती पदाधिकारी मिथुन वानखेड़े अंकुश मनुरे, कुणाल अढागळे बाळु मनुरे सुभाष पवार राजू वानखेड़े, श्रीराम कोळी, सुशील मनुरे, रतन भील, संदीप कोळी आंगनवाड़ी सेविका नलिनी तायड़े आशासेविका सौ. वैशाली महेंद्र कोळी, जितु कोळी गणेश तायड़े राहुल तायड़े मनोहर तायड़े करण मनुरे, सुपडू वाघ पंकज कोंघे, सुभाष गणेश, व विटवे/ सांगवे गावातील सर्वसमाजातील गावकरी तरुण, महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


