खिर्डी येथे श्रामणेर बौध्दाचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

खिर्डी बु येथे श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील खिर्डी बु येथे भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थे च्या आदेशानुसार जिल्हा शाखा जळगाव व तालुका शाखा रावेर व ग्रामशाखा खिर्डी बु यांच्या विद्यमाने दि.१५/०५/२०२२ते २४/०५/२०२२ या कालावधीत श्रामणेर बौधाचार्य प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.[ads id="ads1"] 

   या शिबिराचा उद्येश असा की देशामध्ये जी दिवसेंदिवस अराजकता माजत आहे ती थांबली पाहिजे व भारत देशाने भगवान बुद्ध यांच्या मध्यम मार्गाने वाटचाल केली पाहिजे देशात अंधश्रद्धेने थैमान घातले आहे संपुर्ण तरुणांई व्यसनाधीन झाली आहे देशातील अज्ञान वाढत चालले आहे म्हणून या बाबी कुठेतरी थांबले पाहिजे व भारत देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे भारत देश अज्ञान मुक्त व अंधश्रध्दा मुक्त झाला पाहिजे आणि भगवान बुध्दांच्या धम्माप्रमाणे सदाचारावर आरुढ झाला पाहिजे व प्रगती पथावर गेला पाहिजे.[ads id="ads2"] 

   यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संपूर्ण भारतभर असे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत म्हणून ज्यांना आपल्या जिवनाचे सोणे करायचे असेल त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व समाज सेवेचा संकल्प अंगीकारुन पुण्य संपादन करावे त्याचप्रमाणे या दहा दिवशीय श्रामणेर शिबिरात बसावे व सर्व बौद्ध अनुयायांनी तन मन धनाने सहकार्य करुन पुण्य संपादन करावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा खिर्डी बु यांनी केले आहे ज्यांना दहा दिवसांसाठी श्रामणेर शिबिरात दिक्षा ग्रहण करायची असेल ज्यांना या कार्यक्रमाला सहकार्य करायचे असेल त्यांनी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र जाधव मो.नं.९८९०८२०८८४ जिल्हा संघटक केंद्रीय शिक्षक विजय अवसरमल मो.न.८९७५४३६३९९,९९७०६०५८३४ 

 तालुका अध्यक्ष अनोमदर्शी तायडे सर मो.न.९८२३६६३१८५ केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे मो.न.७८७५५३३०६० ग्रामशाखा अध्यक्ष प्रविण धुंदले सर , मो.न.९७६३४५६३६९शिवदास कोचुरे, मो.न.८५५१९८८७९२ आनंद वाघोदे मो.न.८४५९४७२२७२ उमेश तायडे मो.७४९८३६३०४५ जगदिश कोचुरे मो.७३५००४३२४३ गोपीचंद लहासे मो.८६०५१०४३७५ अंकुश जाधव मो.९५४५८३४४५८ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!