अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवासमाप्ती एकरकमी लाभासाठी 100 कोटीच्या तरतुदीला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याने विविध प्रलंबित प्रकरणे निकाली निघणार आहेत. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्ती,राजीनामा, आकस्मित मृत्यू आणि सेवूतून काढून टाकल्यानंतर एकरकमी सेवा समाप्ती लाभ सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 1 लाख आणि 75 हजार रुपये दिनांक 30 एप्रिल 2014 पासून लागू केला आहे.सदर लाभासाठी लागणार निधी शासनाने आयुर्विमा महामंडळ पुणे यांच्याकडे दरवर्षी सुमारे 42 कोटी वर्ग करणे अपेक्षित आहे. परंतु सादर योजने अनियमितता आली होती.[ads id="ads1"]
परिणामी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 2 ते 3 वर्षेपर्यंत एकरकमी लाभाची रक्कम वेळेवर मिळत नव्हती.या अनुषंघाने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना पनवेल च्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे 15 आक्टोबर 2021 रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.या पुढे आयुक्त कार्यालय रायगड भवन येथे 3 जानेवारी 2022 रोजी धरणे आंदोलन करण्यात आले आणि संघटनेमार्फत सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता.परिणामी शासनाने दखल घेत,अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवासमाप्ती एकरकमी लाभासाठी 100 कोटीच्या तरतुदीला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.[ads id="ads2"]
ज्यामुळे राजीनामा दिलेल्या सेवेतून कमी केलेल्या सेवासमाप्ती झालेल्या आणि मृत्यू होऊनही 2 ते 3 वर्षे एकरकमी लाभाची रक्कम वेळेवर न मिळालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. शासनाने 30 मार्च 2022 रोजी याबाबत शासननिर्णय निर्गमित केले असून त्यात 100 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.याबद्दल संघटनेने शासनाचे अभिनंदन केले.तसेच कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने समान किमान कार्यक्रमानुसार जाहीर केलेली भरीव मानधनवाढ,दरमहा पेन्शन,कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरणे, पोषण ट्रॅकर साठी मराठी भाषा, नवीन मोबाईलसाठी निधी यासह अन्य मागण्याही शासनाने तातडीने सोडवाव्यात अशी मागणी संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर, कार्याध्यक्ष युवराज बैसाणे,रामकृष्ण पाटील,दत्ता जगताप, सुमंत कदम,सुधीर परमेश्वर,अमोल बैसाणे,रवींद्र वळवी यांनी केली आहे.त

