येत्या २८ तारखेला ग स सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. जवळपास पाच पॅनल या निवडणुकीत उतरले आहेत. ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा सचिव संजय भारंबे हे लोकमान्य गटाकडून निवडणूक लढवीत आहेत मात्र रावेर तालुक्यातील ग्रामसेवक शिवाजी सोनवणे ( मस्कावद बु), राहुल लोखंडे ( कोचुर बु उटखेडा ), नितीन महाजन( गहूखेडा ), अतुल पाटील( विवरे खु),अनिल पाटील ( वाघोड)आणि संजय महाजन ( कुंभार खेडा) ग्रामपंचायतीचे कामकाज वाऱ्यावर सोडून प्रचाराच्या कामात व्यस्त असल्याने ग्रामस्थ यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.[ads id="ads2"]
ग स निवडणूकीचे मतदार हे बहुतांशी शासकीय कर्मचारी आहेत; ग्रामसेवक देखील मतदार आहेत ; त्या मुळे विविध शासकीय कर्मचारी असलेल्या मतदार यांच्या भेटी गाठी घेण्यात काहीही अडचण नाही ; मात्र ठराविक ग्रामसेवक त्यांच्याकडे असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यलयात बैठका घेऊन फोटोसेशन करताना दिसत आहेत. आणि आपल्या कामास बाजूला ठेऊन ग्रामपंचायतीच्या कामांना दांडी मारतांना दिसत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत. अश्या ग्रामसेवकांची चौकशी होऊन त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.


