मुक्ताई साखर कारखाना ऊस तोड करीत नसल्याने यावल तालुक्यात 200 हेक्टर ऊस पडून

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


50 टक्के ऊस कोरडा झाला

आघाडी सरकारच्या राज्यात शेतकर्‍यांची दयनीय अवस्था

यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील पाडळसे,कठोरा, कासवे,दुसखेडा परिसरातील अंदाजे 200 एकर ऊसाची तोड मुक्ताईनगर साखर कारखान्याकडून होत नसल्याने तसेच 50% ऊस कोरडा खट्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला,पर्यायी आघाडी सरकारच्या राज्यात शेतकरी हवालदिल झाला असून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"] 

      तालुक्यातील फ़ैजपुर येथील मार्ग येथील मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने तसेच या आधी पण यावल तालुक्यातील बराच ऊस मुक्ताईनगर साखर कारखान्याकडे नेला जात होता आणि आहे,ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी मुक्ताईनगर येथील मुक्ताई सहकारी साखर कारखाना येथे नोंदणी केला आहे. एप्रिल महिन्याची दहा तारीख आल्यावर सुद्धा मुक्ताई सहकारी साखर कारखान्याकडून उसाची तोडणी होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.[ads id="ads2"] 

  ऊस तोडणीसाठी शेतकर्‍यांनी अनेक वेळा मुक्ताईनगरची वारी केली परंतु पदरी निराशा येत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जगावे की मरावे? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे ऊस लागवड करा म्हणून मुक्ताई साखर कारखान्याचे कर्मचारी व पदाधिकारी गावागावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना ऊस लागवड करण्याची विनंती करतात आता मात्र ऊस तोडणीसाठी कोणी फिरकून सुद्धा बघत नाही प्रचंड उन्हामुळे शेतकऱ्यांनी रात्र आणि दिवस डोळ्यात तेल घालून ऊस उत्पादनासाठी साठी घेतलेली मेहनत वाया जाणार की काय या काळजीने शेतकरी व त्याचा परिवार कासावीस होत आहे आतातरी मुक्ताईनगर साखर कारखाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता ताबडतोब उसाची तोडणी करावी अशी मागणी पाडळसे बामणोद परिसरातील शेतकरी बांधव देत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!