रावेर तालुक्यातील चिनावल येथील मूळ रहिवासी व कल्याण येथे नौकरी निमित्ताने रहिवाशी असलेल्या प्रदिप नारायण भंगाळे (वय ५५) यांचे कल्याण स्टेशन वर रेल्वेतून उतरताना पाय घसरून ते गाडी खाली लपेटून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली.[ads id="ads2"]
गेल्या काही वर्षांपासून ते आपल्या कुटुंबियांसह नौकरी निमित्त ते कल्याण येथे वास्तव्यास होते ते दि ६ रोजी चिनावल येथे आले होते.
हेही वाचा : - रावेर तालुक्यातील पाल येथे सुरा घेऊन फिरणाऱ्यावर गुन्हा दाखल
संध्याकाळी कल्याण जाण्यासाठी ते रेल्वे ने निघाले मात्र कल्याण स्टेशन वर सकाळी गाडीतून उतरताना त्यांचेवर काळाने घाला घातला व दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचेवर कल्याण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी, २ मुली, आई १ भाऊ असा परिवार आहे.


