रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) भरदुपारी सुरा घेऊन फिरणाऱ्या एकास रावेर पोलिसांनी रावेर तालुक्यातील पाल येथून अटक केली आहे. पाल येथील लीलाबाई नामदेव पाटील आश्रमशाळेसमोर रोडच्या मध्यभागी आरोपी संजय जलदार तडवी (वय ३५, रा. पाल ता. रावेर) हा ८ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास धारदार सुरा हातात घेऊन फिरताना आढळून आला.[ads id="ads1"]
सरकारतर्फे पो. कॉ. प्रदीप सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात आर्म अॅक्ट ४/२५ अन्वये आरोपी संजय जलदार तडवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads2"]
रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कल्पेश आमोदकर पुढील तपास करीत आहेत. आरोपीचा दहशत माजविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा :- चिनावल येथील इसमाचा कल्याण स्टेशन वर रेल्वेतून पडून मृत्यू


%20-%202022-04-09T081116.032.jpeg)