घनकचरा नदीत टाकल्याने फैजपूर नगरपरिषदेला 3 कोटी 90 लाख रुपयाचा पर्यावरण भरपाई शुल्क पत्र

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील फैजपूर शहराचा प्लास्टिक मिश्रित घनकचरा फैजपुर नगरपरिषदेने धाडी नदीत टाकल्याची तक्रार फैजपूर येथील श्रीराम कॉलनीतील ललितकुमार चौधरी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अजय चव्हाण यांनी फैजपूर नगरपरिषदेला 3 कोटी 90 लाख रुपये पर्यावरण भरपाई शुल्क बाबतचे पत्र दिल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकासह ग्रामीण भागात संबंधित अधिकारी कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"] 

        महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अजय चव्हाण यांनी दि.23 मार्च 2022 रोजी फैजपूर नगरपरिषद आणि ललितकुमार चौधरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,

हेही वाचा :- बोदवडमधील लाचखोर तहसीलदारांसह चौघांची पोलिस कोठडीत रवानगी 

हेहे वाचा :- पत्नी व तिच्या प्रियकराकडून मारहाण;पतीची आत्महत्या ; रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील घटना

फैजपूर येथील गाडी नदीपात्रात प्लास्टिक मिश्रित फैजपुर शहराचा घनकचरा टाकल्या बाबतची तक्रार दि.23/7/ 2021रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्राप्त झाली होती,प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने या कार्यालयामार्फत पाहणी करण्यात आली असून सदर नगर परिषदे विरुद्ध सत्र दिवाणी न्यायालय यावल यामध्ये दि. 12/11/2021रोजी खटला दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दि.8/11/2021 रोजी 3 कोटी 90 लाख पर्यावरण भरपाई शुल्क बाबतचे पत्र फैजपूर नगर परिषदेला देण्यात आलेले आहे असे नमूद केले आहे.[ads id="ads2"] 

           जळगाव जिल्ह्यात काही नगरपालिकांच्या आणि काही ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात प्लास्टिक मिश्रित घनकचरा वाटेल त्या जागेवर नदी नाल्यात सोयीनुसार टाकण्यात आला आहे,अशाच प्रकारची यावल नगर परिषदेची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय नगरपालिका शाखा प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रशांत सरोदे यांच्याकडे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक अधिकारी जळगाव यांच्याकडे दि.28 जानेवारी 2022 रोजी करण्यात आली आहे अद्याप या तक्रारीची दखल फक्त कागदावर घेण्यात आली असून प्रत्यक्षात संबंधितांनी कोणतीही कृती केलेली नाही त्यामुळे यांना जबाबदार धरून पुढील कार्यवाही सुरू आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!