दहा वर्षांचा मुलगा व सात वर्षांची मुलगी असलेल्या विवाहितेने शेजारी राहणाऱ्या प्रियकर युवकाला हाताशी धरून पतीला शिवीगाळ मारहाण करीत दमदाटी करून पलायन केले. यामुळे मानसिक तणावात पतीने आत्महत्या केली. अहिरवाडी येथे ही घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात झाला असून, या दोघा लैला मजनूला रावेर पोलिसांनी अटक केली आहे.[ads id="ads1"]
ईश्वर रमेश मेढे (वय ३२) व त्याची पत्नी कोमल हे मोलमजुरी करणारे कुटुंब. त्यांचा १० वर्षे वयाचा मुलगा व सात वर्षांच्या मुलीसोबत राहत होते. दरम्यान, त्यांच्या शेजारी राहत असलेल्या अमोल समाधान वानखेडे याच्याशी दोन लेकरांची माय असलेली विवाहिता कोमल हिचे सूत जुळल्याने त्यांच्या अनैतिक संबंधांवरून त्या कुटुंबात नेहमी कलह सुरू होता. [ads id="ads2"]
दरम्यान, ईश्वर मेढे हा २९ मार्च रोजी घरी परतला असता त्याची पत्नी कोमल हिच्यासोबत कुरबुर सुरू असताना तिचा प्रियकर अमोल समाधान वानखेडे हा ईश्वरच्या घरात आला. त्या दोघांनी अनैतिक संबंधांतून शिवीगाळ व मारहाण करीत मरून जा... असे म्हणत धमकी दिली. यावेळी ईश्वरची वहिनी व वाड्यातील शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तो वाद मिटविला होता.
यानंतर रात्री मुलगा व मुलगी झोपले असताना त्याची पत्नी कोमल ही प्रियकरासोबत घरातून निघून गेल्याची बाब ईश्वरच्या लक्षात आली. त्याने त्याची वहिनी व आईला ही घटना सांगितली असता त्यांनी शोधाशोध करण्यासाठी घराबाहेर पाय काढत तिच्या माहेरी धाव घेतली.दरम्यान, २९ एप्रिल रोजी ईश्वरने राहत्या घरात गळफास घेतला. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
हेही वाचा : - रावेर तालुक्यातील निलंबित ग्रामसेवकांच्या काळातील विविध कामांची होणार चौकशी
हेही वाचा :- बोदवडमधील लाचखोर तहसीलदारांसह चौघांची पोलिस कोठडीत रवानगी
हेहे वाचा :- पत्नी व तिच्या प्रियकराकडून मारहाण;पतीची आत्महत्या ; रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील घटना
यासंबंधी ईश्वरच्या धाकट्या भावाची पत्नी संगीता मेढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात कोमल ईश्वर मेढे व शेजारचा युवक अमोल समाधान वानखेडे या दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी या प्रकरणी रावेर पोलिसात ईश्वर वानखेडे यांच्या आत्महत्याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव पुढील तपास करीत आहे.


