रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील ग्रामसचिवालयाचे ग्रामविकास अधिकारी विजयकुमार काशीनाथ महाजन व मोहमांडली येथील तत्कालीन ग्रामसेवक तबारत तडवी यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग करताना सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब न करता थेट धनादेशाद्वारे बेकायदेशीररीत्या आर्थिक अनियमितता राखून सुमारे अडीच ते चार लाख रुपयांचा आर्थिक अपहार केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी त्यांच्या विरुद्ध जि. प. सेवेतून तातडीने सेवा निलंबनाची कारवाई केली आहे.[ads id="ads2"]
तथापि, खिर्डी बुद्रुकचे ग्रामविकास अधिकारी विजयकुमार महाजन यांनी खानापूर ग्रा.पं.चा अतिरिक्त कार्यभार व तत्पूर्वी कायमस्वरूपीचा पदभार सांभाळला असल्याने त्यांच्या कार्यकाळातील १४ व्या वित्त आयोग व १५ वा वित्त आयोगाच्या विकासकामांसह अन्य शासकीय योजनांमधून झालेल्या विकासकामांमधील आर्थिक व्यवहार संशयाच्या गर्तेत सापडले आहेत.
हेही वाचा :- बोदवडमधील लाचखोर तहसीलदारांसह चौघांची पोलिस कोठडीत रवानगी
हेहे वाचा :- पत्नी व तिच्या प्रियकराकडून मारहाण;पतीची आत्महत्या ; रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील घटना
तसेच मोहमांडली येथील निलंबित तत्कालीन ग्रामसेवक तबारत तडवी यांनीही कुसुंबा बुद्रुक व तद्नंतर आता पाडळे बुद्रुक येथील ग्रा. पं.चा कार्यभार सांभाळला असल्याने त्या ग्रा. पं. मधील आर्थिक व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
चौकशीकडे लागले लक्ष
रावेर तालुक्यातील एकाच वेळी दोन ग्रामसेवकांविरुद्ध सेवा निलंबनाची कारवाई झाल्याने तालुक्यात कमालीची खळबळ उडाली आहे. तर चौकशीत आणखी काय घोटाळे पुढे येतात? याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.


