क्रांतिसूर्य महात्मा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) सामाजिक समता मंच रावेर व प्रकाशवाट मित्रपरिवार चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत अश्विनी शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकवला.[ads id="ads1"] 

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथील अल्पबचत भवन सभागृहात माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे अध्यक्षतेखाली पार पडली. या स्पर्धेचे उदघाटक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजु सूर्यवंशी हे होते .[ads id="ads2"] 

विद्यार्थ्यांनी सर्वंकष परिवर्तनासाठी समाजात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मौलिक ग्रंथांचे चिंतन करून समाजात विचार पेरण्याचे काम करून समतावादी समाज निर्मितीसाठी परिश्रम घ्यावे असे आवाहन मुकुंद सपकाळे यांनी आवाहन केले. विचार मंचावर सामाजिक समता मंचचे अध्यक्ष राजू सवर्णे , उमेश गाढे, अमोल कोल्हे , सरपंच सचिन बिऱ्हाडे, प्रा. संजय साळवे, दिलीप सपकाळे, वाय. एस. महाजन, प्रा. विजय गोसावी, सिद्धार्थ तायडे, सुनीता तायडे, उद्योजक विशाल देवरे उपस्थित होते. 

  या वक्तृत्व स्पर्धेमध्ये ६० विद्यार्थ्यांना सहभागी झाले. राष्ट्र निर्मितीसाठी युवकांची भूमिका या विषयावर अतिशय परखड मत मांडुन अश्विनी शिंदे यांनी ७००० रुपये रोख व प्रमाणपत्र स्मृती चिन्हासह प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. तर सर्वांगीण क्षेत्रात महिलांची झेप याविषयावर जागतिक आणि भारतीय स्तरावरील महिलांचे क्रांतिकारक योगदान विशद करत नेहा शिंदे यांनी ५००० रूपये रोख प्रमाणपत्र व स्मृतिचिन्हासह द्वितीय क्रमांकाचे बक्षीस घेतले. 

  महात्मा फुले यांचे कार्य आणि कर्तृत्व याविषयावर आधुनिक भारतातील शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व नमूद करून हेमलता शिसोदे यांनी ३००० रुपये रोख प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे बक्षीस मिळवले. सायली महाजन, रोशन पाटील, तपस्वी गवळी , भूमिकेत सोनवणे , जान्हवी चौधरी , गौरव पाटील, सरोजिनी जैन यांना उत्तेजनार्थ ५०० रुपये रोख प्रमाणपत्र व स्मृतीचिन्हाचे वितरण करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश गाढे यांनी तर सुत्रसंचलन नगीन इंगळे व आभार भीमराव कोचुरे यांनी मानले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण सुरेश ठाकूर , प्रा. सतिष अहिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक समता मंच , रावेर व प्रकाशवाट मित्रपरिवार , चोपडा यांच्यासह शुभांगी माळी, पूजा गुजराथी, घनश्याम माळी, शुभम रावते यांनी कामकाज पाहिले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!