शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला केल्याने यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तिव्र निषेध

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील) दरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी काही समाजकंटकांनी व माथे फिरूनीं दगडफेक केली या निषेधार्थ यावल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व सेलच्या तालुकाध्यक्ष,पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काल दि.11 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता यावल येथील नायब तहसिलदार आर के पवार यांना निवेदन देऊन निषेधात्मक घोषणा दिल्या व निषेध व्यक्त केला. [ads id="ads1"] 

      मा‌.न्यायालयाचा निर्णय आल्यावर काही एस.टी. कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून व गुलाल उधळून आनंद व्यक्त केला असतांना आज दगडफेक करण्याचे कारणच काय?आज पर्यंत नेत्यांच्या घरावर अशा प्रकारचे कृत्य पुरोगामी महाराष्ट्रात कधीही घडलेले नाही.महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या शरद पवार साहेबांच्या घरावर अशाप्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असून याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.पोलिसांनी या दगडफेकी मागील खरे करते करवते कोण? याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी.[ads id="ads2"] 

  या घटनेचा निषेध करण्यासाठी यावल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलच्या तालुकाध्यक्ष,पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी नायब तहसिलदार पवार यांना निवेदन देऊन घोषणा दिल्या व निषेध व्यक्त केला. 

       या प्रसंगी तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले,विजय प्रेमचंद पाटील,दिनकर सिताराम पाटील, पक्षाचे प्रवकते अतुल पाटील, बोदडेनाना,देवकांत पाटील,सौ. उज्वला महाजन,एम.बी.तडवी सर,हितेश गजरे,ललित पाटील, करीम मण्यार,कदीरभाई खान, अय्युब खान(जनाब),फारुक मुनशी,नानाजी प्रेमचंद पाटील, अनिल जंजाळे,हाजी गफ्फार शहा,दिनेश सिताराम पाटील,डी. के.पाटील,भैयासाहेब पाटील, भागवत अटवाल,नरेंद्र सोनवणे, कामराज घारु,डॉ.हेमंत येवले, अरुण लोखंडे,राहुल चौधरी, विकास पाटील,किशोर माळी, नरेंद्र शिंदे,अशफाक शहा,शेख उस्मानभाई,आरीफ खान, भगवान बरडे,बापू जासुद,गोपाळ काकडे,विलास येवले,निलेश बेलदार,सरदार तडवी,भिकन मराठे,नईम शेख,निसारोददीन अमिरोददीन,प्रसंना पाटील, भिकन मराठे,अजय मोरे,राहुल गजरे,विनोद पाटील,रामु गोविंदा पाटील असे बहुसंख्य राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!